“उद्यानांमध्ये आता पुरुष आणि स्त्री यांना एकत्र फिरता येणार नाही”

नवी दिल्ली |  अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी (Taliban) अफगाण नागरिकांवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील महिलांवर अनेक प्रकारची निर्बंध घातली आहेत. त्यामुळे सध्या तालिबानच्या दहशतीखाली अफगाण महिलांना जीवन जगावं लागत आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा केल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करता येणार नसल्याचं तालिबानी सरकारने सांगितलं होतं.

तालिबानियांनी आता आणखी एक नवा निर्बंध लावला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तालिबांनीयांवर टीका करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानातल्या उद्यानांमध्ये आता पुरुष आणि स्त्री यांना एकत्र फिरता येणार नाहीये. पुरुषांनी बागेत फिरण्याचे दिवस वेगळे आणि स्त्रियांचे वेगळे असं ठरवून देण्यात आलं आहे.

आता या नव्या निर्बंधांमुळे तालिबानची चर्चा रंगली आहे. त्यांच्या अजब निर्बंधामुळे महिलांना आपलं स्वातंत्र्य गमवावं लागत आहे.

तालिबानमधील महिलांना बहुतांश सरकारी नोकऱ्या आणि माध्यमिक शालेय शिक्षणातून बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान, अफगाण नागरिक तालिबान्यांच्या भीतीने देश सो़डून निघून गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आमदारांच्या मोफत घरांवरून शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव