रात्री झोपल्यावर ‘या’ कारणामुळे वाढतोय पुरुषांच्या जीवाला धोका; धक्कादायक माहिती समोर

मुंबई |  तापमानात सातत्याने वाढ होत असल्यानं सध्या उष्णता वाढताना पहायला मिळत आहे. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या जाणवायला लागल्या आहेत.

दिवसभर तापमानात वाढ होत असल्यानं शारिरीक थकवा देखील जाणवताना दिसतोय. असं असताना आता रात्रीच्या वेळी तापमानात वाढ होत असेल तर सावध व्हा.

रात्रीच्या वेळी तापमानात वाढ होत असल्यानं पुरूषांना आरोग्याच्या अधिक समस्या जाणवायला लागल्या आहेत. आरोग्य विषयक संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

केवळ 1 डिग्री तापमान देखील वाढलं तर ह्रद्याशी संंबंधित प्रकाराच्या रूग्णांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होतो. पुरूषांच्या तब्येतीवर रात्रीच्या तापमान वाढीचा परिणाम जास्त होतो, असं संशोधनातून समोर आलं आहे.

टोरंटो विद्यापीठाच्या एका टीमनं याबाबत संशोधन केलं आहे. सामान्य तापमानात 1 डिग्री देखील रात्रीच्या वेळी वाढ झाली तर पुरूषांच्या मृत्यूचं प्रमाण 4 टक्के वाढतं, असंही समोर आलंय.

इंग्लंड आणि वेल्समधील काही लोकांचे नमुने या टीमनं घेतले होते. महिलांच्या प्रमाणात तापमान वाढीचा प्रभाव हा पुरूषांवर जास्त दिसून आला.

तापमानात वाढ ही प्रदेशानूसार बदलत जाते परिणामी तापमान वाढीसोबतच मृत्यूचं प्रमाण देखील बदलत जातं. परिणामी काळजी घेण्याची गरज आहे. ह्रद्याशी संंबंधित आजार असलेल्यांना जास्त काळजीची गरज आहे.

रात्रीच्या वेळी घाम येणं, घशात खवखवणं, छातीत दुखणं, अशा प्रकारचा त्रास होत असेल तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. वेळीच डाॅक्टरांशी संवाद साधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”

काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”