केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या

मुंबई |  केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला काही निर्दयी लोकांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील खासदार आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्न मनेका गांधी यांनी एएनआयशी बोलताना विचारला.

वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे मेनका गांधी म्हणाल्या.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने उचललं महत्त्वाचं पाऊल!

-5 अनाथ मुलांना मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी दिला मदतीचा हात

-आनंदाची बातमी… कोरोनाला आपण हरवणारच, राजेश टोपेंची महाराष्ट्राला मोठी गूडन्यूज!

-अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राने मुंबईत लोकल सुरू करावी; आव्हाडांची मागणी

-माणुसकी मेली, गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फुटले अश्रूंचे बांध…!