नवी दिल्ली | भारतीय हवामान खात्याने केरळसह 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हलका ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील 5 दिवसांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यादरम्यान 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील यानम आणि रायलसीमा व्यतिरिक्त दक्षिण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल. यासोबतच हवामान खात्याने तामिळनाडूसाठी 25-26 नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरायला लागला असून थंडी सतत वाढत आहे. काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली असून तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे.
श्रीनगरमध्ये सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ती आतापर्यंतची सर्वात थंड रात्र ठरली.
काश्मीरमध्ये गेल्या काही रात्री तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात असून बहुतांश ठिकाणी या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी तापमानाची नोंद केली जात आहे, असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करू नये आणि त्यांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागली”
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
“2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष करायचाय”
देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, मोठं कारण आलं समोर
अण्णा हजारेंनी घेतला अजित पवारांचा धसका?, ‘या’ निर्णयाची रंगलीय खमंग चर्चा