पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई |  राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या वर्षांत अनेकवेळा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान केलं आहे.

पुढील चोवीस तासांमध्ये अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

त्यातच आता हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन ते चार तासांंमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम आणि हलका पाऊस येण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या 24 तासांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने याचा फटका गुजरात किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे.

पुढील चोवीस तासांत याचा परिणाम अधिक जाणवणार असल्याने किमान पाच दिवस मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. या वाऱ्यांचा वेग 50 किमीपर्यंत वाढण्याची देखील शक्यता आहे.

तसेच उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरड हवामान राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

याआधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

24 आणि 25 जानेवारीला राज्यात वातावरण धुई -धुके राहिल यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सलमान खानचं टेन्शन संपेना! शेजाऱ्यानेच केलेत धक्कादायक आरोप

अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस

दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत