गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक

गांधीनगर | केंद्र सरकारने इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांची सोय केली. मात्र आजही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमध्ये अडकून पडलेले कामगार घरी जाण्यासाठी रस्त्यावर येताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सूरत, अहमदाबाद शहरात परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर येत पोलिसांवर हल्ला केला होता.

भरुच जिल्ह्यातील इंडस्ट्रिअल एरियात सुमारे 150 परप्रांतीय कामगारांचा गट आपल्याला घरी जाण्यासाठी सोय करावी या मागणीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात जमा झाला होता. यावेळी संतापाचा उद्रेक झाल्यानंतर कामगारांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. गुरुवारीही काही कामगार रस्त्यावर उतरले होते. मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करत त्यांना धीर दिला.

महत्वाच्या बातम्या-

-कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 11 महत्त्वाच्या घोषणा

-‘सरकारला जाग कधी येणार?’; KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदमांचा सरकारला सवाल

-महिलेच्या बाळंतपणात सुप्रिया सुळेंची मायेची ऊब, माहेरहून आईला आणण्यासाठी केली मदत

-शेतीसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॅकेजची घोषणा