परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

सुरत | सुरत जिल्ह्यातील वरेली गावाजवळ रोजगारासाठी आलेले मजुर आपल्या घरी जाण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले होते. यावेळी घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांवर कामगारांनी दगडफेक केल्याची माहिती आहे.

कामगारांनी परिसरात उभ्या असलेल्या काही गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. अखेरीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. याचसोबत पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला.

परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवलेला असून परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे. याआधीही सूरतमध्ये मजुरांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती.

दरम्यान, केंद्र सरकराने इतर राज्यात अडकलेल्या लोकांना घरी जाण्याची परवानगी दिली असली तरीही काही मजुर अजून इतर राज्यांत अडकून पडले आहेत. संयमांचा अंत झाल्यामुळे कामगार वर्ग रस्त्यावर येत असल्याचं पहायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन

-उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

-लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

-“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

-भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले