मिका सिंगने नॅशनल टीव्हीवर ‘या’ सिंगरला लग्नासाठी घातली मागणी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | गायक मिका सिंग सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मिका सिंगची सर्वच गाणी तरुणाईला वेड लावून सोडतात. त्याच्या गाण्यांचे बोल तरुणांच्या ओठावर नेहमीच तरळत असतात. मिका सिंगचा आवाज कानावर पडताच नकळत पाय थिरकू लागतात.

आपल्या गाण्याने तरुणाईला वेड लावणारा मिका सिंग गाण्याबरोबरंच इतरही अनेक कारणाने सतत चर्चेत असतो. तो अनेकदा आपल्या फॅन्सला शॉकिंग बातम्या देत असतो. सध्या सोशल मीडियावर मिका सिंगचा एका रिऍलिटी शोदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मिकाने रिऍलिटी शो दरम्यान एका सिंगरला लग्नासाठी मागणी घातली आहे. नॅशनल टीव्हीवर मिकाने सिंगरसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याने सर्वचजण शॉक झाले आहेत. मिकाच्या चाहत्यांना तर मोठा धक्का बसला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘इंडिअन प्रो म्युझिक लीग’ या रिऍलिटी शो दरम्यानचा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मिका स्टेजवर गाणं गात असल्याचं दिसत आहे. तो यावेळी ‘मुझसे शादी करोगी?’ हे गाणं गात असतो. यावेळी सर्वचजण मिकाचं गाणं एन्जॉय करताना दिसत आहेत.

गाणं गात असतानाच मिका सिंग गायिका भूमी त्रिदेवीला स्टेजवर घेऊन येतो. स्टेजवर मिका भूमीकडे पाहून गाणं म्हणू लागतो. यानंतर तो सतत भूमीला ‘मुझसे शादी करोगी?’ असं विचारत राहतो. हे पाहून उपस्थित सर्वचजण शॉक होतात.

शो मधील सर्व स्पर्धक आणि जज मिकाकडे आश्चर्यचकित होऊन पाहतंच राहतात. यावेळी मिका स्टेजवर गुडघ्यावर बसतो आणि पुन्हा भूमीला लग्नासाठी मागणी घालतो. भूमी देखिल मिकाला स्टेजवर लगेच उत्तर देते.

मिकाला उत्तर देताना भूमी म्हणते की, मी या शोमध्ये तुमच्यासाठी एक नवरी शोधण्यासाठी आली आहे. मग हा तर इतरांवर अन्याय होईल. भूमीचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागतात आणि शोदरम्यान एकंच हशा पिकतो.

दरम्यान, मिका सिंगची रिलेशन्स तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यामुळे शो दरम्यान घडलेला हा किस्सा जरी एक विनोद वाटत असला तरी मिका पाजी केव्हा शॉक देतील सांगता येत नाही. यामुळे या व्हिडीओची एकंच चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

महत्त्वाच्या बातम्या-

महिलेवर बलात्कार करून पळत होता आरोपी, कुत्र्याने केलं असं काही की आरोपी गेला गजाआड

कॅमेरा चालू असतानाच योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेणं अंगलट, तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

‘सुशांतसारखं कार्तिकलाही फासावर जाण्यास भाग पाडू…

‘तो’ फोटो शेअर करत कंगना रणौतनं महाराष्ट्रातील…