मुंबई | आयटम गर्ल राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला राखीमध्ये आहे. यामुळे राखीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
राखी नेहमीच माध्यमांशी दिलखुलासपणे संवाद साधत असते. ती आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी पॅपराजींबरोबर शेअर करत असते. राखीच्या या बिनधास्त वागण्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या देखील जास्त आहे.
अशातच आता गायक मिका सिंग याने राखी सावंतसोबतच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. झी कॉमेडी शोच्या एका भागात मिका सिंग विशेष अतिथी म्हणून पोहोचला होता. या भागात कलाकारांनी उपस्थितांना भरभरून हसवलं.
या भागात सिद्धार्थने राखी सावंतची भूमिका साकारत अभिनय केला. त्याच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं. सिद्धार्थच्या अॅक्टनंतर मिकाने राखीसोत असणाऱ्या नात्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला.
राखी माझी एक खूप जवळची मैत्रिण आहे. राखीला मी खूप जवळून ओळखतो. तिला माझ्यापेक्षा चांगलं कोणीही ओळखत नाही, असं मिका सिंगने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. राखी सोशल मीडियावरुन सतत आपल्या चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. राखीनं बिग बॉसचा 14 वा सीझन तुफान गाजवला. एवढंच नाही तर ती टॉप 5 स्पर्धकांमध्येही पोहोचली होती. परंतु त्यानंतर 14 लाखांची रक्कम घेऊन राखी घरातून बाहेर पडली.
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर
वाह रे पठ्ठ्या! पोलिसांनी गाडी उचलून नेल्यानं पुणेकरानं थेट बांधलं स्कूटीचं स्मारक
आजीने आजोबांना केलं किस; आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ
लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ