महाराष्ट्र मुंबई

भाजपकडून लोकशाहीचा गळा आवळण्याचं काम सुरु आहे- अशोक चव्हाण

मुंबई : ही दडपशाही आहे.भाजपकडून लोकशाहीचा गळा आवळण्याचं काम सुरु आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

कर्नाटकमधील बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार हे मुंबईत आले होते. त्यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच अडवलं. डी के शिवकुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या रनेसान्स हॉटेलमध्ये तळ ठोकून बसले आहेत.

डी के शिवकुमार यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, असं कर्नाटकच्या आमदारांनी सांगितलं त्यामुळे मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलच्या बाहेर अडवलं.

शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून हॉटेलबाहेर ‘शिवकुमार गो बॅक’ असे नारे सुरु होते.

दरम्यान, पोलिसांना या सर्व घडामोडींची कल्पना होती त्यामुळे पोलीस आधीच हॉटेलच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय पोलिसांनी परिसरात संचारबंदीही लागू केली होती.

IMPIMP