अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमी चर्चेत असतो. स्वतःपेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कंवरसोबत लग्न केल्यापासून दोघांची चांगलीच चर्चा होत असते. अधेमधे येणाऱ्या त्यांच्या फोटोंमुळे या चर्चांना चांगलीच फोडणी मिळत असते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत असतात. आताही दोघांचा असाच एक फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. कित्येकांनी हा फोटो शेअर केला आहे.
काय आहे अंकिता आणि मिलिंदचा फोटो?
इन्स्टाग्रामवर अंकिताने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंकिता आणि मिलिंद एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहेत. दोघांकडे पाहिल्यावर ते किती उत्कट चुंबन घेत आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. फोटो मागे अत्यंत निसर्गरम्य लोकेशन असल्याचं दिसतंय. त्यामुळे दोघांच्या प्रेमाला धुमारे फुटले आहेत. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. एवढंच नव्हे तर अंकिताने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन धमाकाच केला आहे. त्यांच्या या चुंबनदृश्याला आता सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया-
अर्थात लोकांच्या प्रतिक्रियांकडे मिलिंद आणि अंकिता लक्ष देत नाहीत. असं असतं तर त्यांनी हा फोटोच इन्स्टाग्रामवर अपडेट केला नसता. काही लोकांनी दोघांच्या या प्रेमाला चांगलीच दाद दिली आहे. दोघांमधील प्रेमाला चांगल्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही लोकांना मात्र दोघांचा हा फोटो आवडलेला नाही. अशा प्रकारे प्रेम जगजाहीर करण्याची गरज नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे.