मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला तर 4 सदस्य तटस्थ राहिले. मात्र तटस्थ राहिलेल्या सदस्यांपैकी एमआयएमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
आम्ही जरी तटस्थ राहिलो असलो, तरी मी उद्धव ठाकरेंना आश्वासन देतो की तुम्हाला जेव्हा केव्हा आमची गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माईल यांनी म्हटलं आहे.
विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतर आमदार मोहम्मद इस्माईल यांनी सभागृहात भाषण केलं. यावेळी त्यांनी आम्ही तटस्थ असलो तरी गरज असेल तेव्हा तुमच्यासोबत असू, असं म्हटलं आहे.
दरम्यान, विश्वादर्शक ठरावावेळी 4 सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यात मनसे 1, माकप 1, तर एमआयएमच्या दोन आमदारांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
राहुल बजाज यांची अमित शहा यांच्यावर जोरदार टीका – https://t.co/HezsRzV1pW @Rahul_Bajaj @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“शेतकरी पुत्र विधानसभेचा अध्यक्ष झाल्याचा आनंद”- https://t.co/Gko29dxWa9 @uddhavthackeray @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड – https://t.co/4eNyQZXJLd @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019