मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (masjid loudspeaker) हटवण्यासाठी दंड थोपटले आहेत. राज यांनी आज शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं.
मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या (masjid) बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे, असं राज म्हणाले. यावर आता एमआयएमने प्रतिक्रिया दिलीये.
राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवैसीनी (Asaduddin Owaisi)फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील (masjid) बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत.
घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे.
रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे.
अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसं काय बिघडू शकतं? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Skin Care | उन्हाळ्यात दह्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!
इम्रान खान यांच्यानंतर पुढचा पंतप्रधान कसा निवडला जाईल?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या
UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज