मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भोवळ आल्यानं शुद्ध हरपल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्याचं वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्याचं काहीच कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितलं.
सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचंही टोपेंनी सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेतेमंडळींनी धाव घेतल्याचं समजतंय. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.
मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकतं, असं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की…
‘ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो’; राज ठाकरे आव्हाडांवर बरसले
राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…
“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती