महाराष्ट्र मुंबई

‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे, तो धारावी पुनर्विकासाचा असेल, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्याबाबत पत्र लिहिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उलाढालीला सुरुवात होईल, व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे. तो धारावी पुनर्विकासाचा असेल, मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचं पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

दरम्यान, देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

-अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट

-‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द

-कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

-झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला

-रामजन्मभूमीचं सपाटीकरण करत असताना सापडल्या प्राचीन मूर्ती-शिवलिंग; वाचा संपूर्ण प्रकार