एप्रिलमध्ये ठाकरे सरकार पडणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | राज्याच्या राजकारणात 2019 ला इतिहास घडला होता. कायम एकत्र असणारे शिवसेना आणि भाजपनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच गाजला. भाजपने वारंवार सरकार पडणार असल्याचं भाकित केलं आणि दरवेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या.

अशातच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी पुन्हा तारीख बदलली आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एप्रिलमध्ये चिंता दूर होणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील एप्रिलचे संकेत दिले आहेत.

शिवाजी महाराज यांच्या काळात कायदा आणि सुव्यस्था होती. आता राज्यात अत्याचार होत आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

बोलाची कडी, बोलाचा भात, असा सरकारचा कारभार सुरु आहे. एप्रिलमध्ये सगळ्या चिंता दूर होणार आहेत, असं भाकित आता प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

एप्रिलमध्ये काहीतरी नवीन घडेल असे प्रविण दरेकर, चंद्रकांतदादा म्हणतात असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा, अशी काव्यत्मक ओळी त्यांनी यावेळी म्हटल्या आहेत.

एका कार्यक्रमावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी राज्याचे राज्यपाल देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी देखील सुचक वक्तव्य केलंय.

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल, असं राज्यपाल म्हणाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात राज्यपालांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…

“मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं, मी टरबुज्या म्हणणार नाही पण…”

“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”

ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी