“आता नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मिळतील याची काही शाश्वती नाही”

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून काही होऊ शकत नाही, असं राव इंद्रजीत यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय.

नरेंद्र मोदींचा आपल्यावर आणि राज्यावर आशीर्वाद आहे. पण मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नसल्याचं राव इंद्रजीत यांनी म्हटलं आहे.

मतदार नरेंद्र मोदींच्या नावे मत देईल असा आपला हेतू असू शकतो. पण हे तळागळात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदार मत देतील हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असंही राव इंद्रजीत म्हणालेत.

केंद्रात नरेंद्र मोदींमुळेच भाजप सत्ता स्थापन करू शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला. हरियाणातही पहिल्यांदा भाजपने आपलं सरकार स्थापन केलं. दुसऱ्यांदाही भाजपला यश मिळालं. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते, असं राव इंद्रजीत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही दिवसागणिक वाढत आहे. देशामध्ये निवडणुकीदरम्यान मोदींच्या नावाने मतं दिल्याचं बोललं जातं.

महत्वाच्या बातम्या-

वर्मावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले…

आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका- चित्रा वाघ

काय सांगता! एकटा कुत्रा चक्क दोन-तीन वाघांना भिडला, पाहा व्हिडीओ

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ