“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

मुंबई | भाजपला दोषच शोधायचे असतील तर सुरतमध्ये मजुरांचा असंतोषाचा भडका उडाला आहे. भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तो भडका शमवण्याचा सल्ला द्यावा, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले आहेत.

भाजपकडून 22 मे रोजी म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात ‘माझं अंगण, माझं रणांगण’ अशा स्वरुपाचं आंदोलन केलं जाणार आहे. याच आंदोलनावरुन सुभाष देसाई यांनी भाजपवर टीका केली आहे.

‘पार्टी विथ डिफरन्स असं बोलणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आपल्या कार्यकर्त्यांना 22 मे या तारखेला ‘माझं अंगण, माझं रणांगण’ असं आंदोलन करण्यास सांगितलं आहे. हा निव्वळ एक स्टंट आहे, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावलाय.

राज्याची जनता, सरकार आणि प्रशासन सध्या कोरोनाविरोधात लढत आहेत. कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ते झटत आहेत. कार्यकर्त्यांनी या परिस्थितीत आंदोलन करण्यापेक्षा जनतेशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न कारावा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

-आत्तापर्यंत 30 लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोहोचवले- पीयूष गोयल

-कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

-काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

-‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन