“ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार”

महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी एका बाजूला प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. अशातच जळगाव मधील एका महिलांच्या वसतीगृहातील लज्जास्पद घटना समोर आली आहे.

जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याची ध.क्कादायक घटना घडली. या घटनेविषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. यातच पंकजा मुंडे यांनी सरकारवर खोचक टोला लगवालेला पहायला मिळाला.

जळगावमधील या घटनेविषयी बोलताना ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलाय. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अ.त्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

सुमारे अर्धा-पाऊण तासाच्या या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारविरोधातील सं.ताप व्यक्त केला. जळगावातील घटनेने महिलांवरील अ.त्याचाराचं प्रकरण पुन्हा एकदा च.व्हाट्यावर आलं आहे. राज्यात अरेरावी सुरू आहे. जळगावातील घटनेत पोलीस अधिकारीच असल्याची ध.क्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? ज्या राज्यातील सत्तेतील लोकच आपल्या प्रतिमेचं पोषण करू शकत नाही. तेच जर अन्याय करणारे असतील तर दुसऱ्यांना काय शिस्त लागणार आहे?, असं पंकजा मुडेंनी म्हटलं आहे. ‌‌‍‍ ‍‍

दरम्यान, आशादीप महिला वसतीगृहात हा सं.तापजनक प्रकार घडला असून तेथील काही तरुणींसोबत कि.ळसवाणे कृ.त्य करण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा समोर येत तो स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दाखवला गेला. त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या! काकडी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे राजयोग

लवकरंच मिळणार गोड बातमी! पेट्रोल 45 रुपये लीटरवर येणार तर डिझेल देखील कमी होणार?

अबब…सोन्याच्या दरात फार मोठी घसरण; वाचा आजचे दर

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ मंत्र्याच्या से.क्स सीडीतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल