मोठी बातमी! ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवाईवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील तणाव वाढत आहे. ईडीनं राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आता ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

सकाळी साडेसहाच्या सुमारास ईडीच्या पथकानं मलिक यांच्या घरी कारवाई केली आहे. मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात नेलं आहे.

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक हे ईडीच्या रडारवर आहेत. मलिकांना सकाळीच कार्यालयात नेण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

कार्यालयात सकाळी 7 वाजल्यापासून मलिकांची चौकशी सुरू आहे. मलिक यांनी सातत्यानं मोदी सरकारवर जहरी टीका केल्यानं त्यांच्यावर कारवाई केल्याची टीका राष्ट्रवादीनं केली आहे.

गेल्या महिन्यात राज्यात एनसीबीनं मोठी कारवाई केली होती. बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

एनसीबीनं केलेली सर्व कारवाई ही बेकायदेशीर आणि राज्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे, अशी टीका राज्य सरकारनं केली होती. तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद देशात गाजला होता.

दरम्यान, एनसीबी, ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मलिक यांनी जोरदार टीका केली होती. अशात आता त्यांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानं राज्याती वातावरण तापलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच” 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”