T20 WC 2007 च्या फायनलमधील शॉटबद्दल मिसबाह मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत पहिला T-20 विश्वचषक फायनल सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे भारताच्या बोर्डवर 157 धावा लावल्या. पाकिस्तानच्या डावात खेळात अनेक चढ-उतार आले. अटीतटीच्या सामन्यात सामनाच्या पारडं वारंवार फिरत होतं.

दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज झाली आणि अखेर भारताचा विजय झाला. या सामन्याची फायनल ओव्हर सर्वात रोमांचक अशी होती.

पाकिस्तानचा फलंदाज मिसबाह-उल-हक मैदानात एकटा तळ ठोकून उभा होता. त्यावेळी जोगींदर शर्माच्या चेंडूवर मिसबाह बाद झाला होता. त्यावर आता मिस्बाहने मोठं वक्तव्य केलं आहे.

मी नेहमी म्हणतो की, 2007 मध्ये प्रत्येक सामन्यात मी तो शॉट खेळत अनेक चौकार मारले. फाईन लेग ऑन असतानाही मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकच शॉट खेळत होतो, असं मिसबाह म्हणाला.

फिरकीपटूंविरुद्ध मी त्या फटक्याने फाइन लेग मारायचो. तर, तुम्ही म्हणू शकता की माझा अतिआत्मविश्वास होता. ज्या शॉटवर मला सर्वाधिक आत्मविश्वास होता तो मी चुकवला, असंही मिसबाह म्हणाला आहे.

दरम्यान, भारताने या T-20 विश्वचषकात दिमाखदार कामगिरी केली होती. भारताचा स्टार मध्य फळीचा फलंदाज युवराज सिंगने याच विश्वचषकात 6 चेंडूत 6 षटकार खेचले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!

 हटके सायकलची जोरदार चर्चा, निवडणुकीआधी 6 फुटी सायकल ठरतीये सेल्फी पाॅईंट

 क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा सामना, त्यादिवशी झालं असं की…

ना रश्मिका ना प्रिया! नव्या ‘नॅशनल क्रश’ची सोशल मीडियावर एकच चर्चा

 “त्यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”, अंनिस वादाच्या भोवऱ्यात; अविनाश पाटील यांचे गंभीर आरोप