Top news मनोरंजन

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता  चित्रपट सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी आणि बंगाली सिनेमांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा भर तारुण्यात मृ.त्यू झाला आहे. मिष्टी मुखर्जी असं मृ.त्यू झालेल्या अभिनेत्रीचं नाव असून वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मिष्टीचं नि.धन झालं आहे.

शुक्रवारी संध्यकाळी मिष्टीनं बंगळूरू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. मिष्टी मुखर्जीवर शनिवारी बंगळूरू मध्येच अं.त्यसंस्कार करण्यात आले आहेत. मिष्टीवर ऐन तारुण्यात ओढावलेल्या मृ.त्युमुळे हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मिष्टी मुखर्जी किडनीच्या आजारानं त्रस्त असल्यानं ती कोटो डाईटवर होती. मिष्टीची किडनी फेल झाल्यानं तिच्यावर बंगळूरू येथील रुग्णालयात उपचारही चालू होते. कित्येक महिन्यांपासून मिष्टी मृ.त्यूशी झुंज देत होती. मात्र, शुक्रवारी अखेर तिची मृ.त्यूशी झुंज थांबली आणि मिष्टीनं या जगाचा निरोप घेतला.

2013 मध्ये मिष्टीनं ‘मैं कृष्णा हूं’ या चित्रपटातून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामुळेच हिंदी प्रेक्षकांना मिष्टीची ओळख झाली होती. यानंतर मिष्टीनं अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, मिष्टीच्या अशा अचानक जाण्यानं मिष्टीचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.

मिष्टीच्या पश्चात तिची आई, वडील आणि भाऊ आहे. मिष्टीच्या जाण्यानं मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बंगाली सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही मिष्टीच्या मृ.त्युनंतर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, 2013 मध्ये मिष्टीनं चित्रपट सृष्टीत पाऊल  ठेवलं होतं. मात्र, 2014 मध्येच चित्रपट सृष्टीतून मिष्टीवर अनके गंभीर आरोप करण्यात आले होते. 2014 साली मिष्टी चित्रपट सृष्टीत चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी अनेक लोकांनी तिच्यावर टीका केली होती.

2014 साली मिष्टीवर चित्रपट सृष्टीत से.क्स रॅकेट चालवण्याचा आरो.प लावण्यात आला होता.  मिष्टीवर से.क्स रॅकेट चालवण्यासारखा गंभीर आरो.प लागल्यानंतर पोलिसांनी मिष्टीच्या घराची झडती घेतली होती. यावेळी पोलिसांनी मिष्टीच्या घरातून अनेक गोष्टी जप्त केल्या होत्या.

मिष्टीच्या घराची झडती घेताना पोलिसांना घरात अनेक सीडीज आणि संशयास्पद गोष्टी मिळाल्या होत्या. या छापेमारीनंतर मिष्टी मुखर्जीला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये पकडलं होतं. यानंतर पोलिसांनी तिच्यावर गु.न्हा दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो

‘आयएएस’च्या स्वप्नाआड पैशांची आली अडचण, तिथंही धावून आला सोनू सूद!

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!