लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली | भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी अचानक मितालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.

मितालीने केवळ भारताची आतापर्यंतची सर्वाधिक कॅप असलेली महिला क्रिकेटपटूच नाही तर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणूनही निवृत्ती घेतली, तिने भारतासाठी 333 सामन्यांमध्ये 10,868 धावा केल्यात.

आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं ही सर्वोच्च सन्मानाची बाब आहे. माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे, असं तिने सांगितलंय.

प्रत्येक घटनेने मला काहीतरी वेगळं शिकवलं. माझ्या आयुष्यातील शेवटची 23 वर्षे सर्वात आव्हानात्मक आणि आनंदाने भरलेली आहेत. सर्व प्रवासाप्रमाणे, हा देखील संपला पाहिजे, असं मितालीने म्हटलं आहे.

तिरंग्याचं प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी मी नेहमी जपत राहीन. मला वाटतं की माझी खेळण्याची कारकीर्द संपवण्याची हीच योग्य वेळ आहे कारण संघ काही अतिशय प्रतिभावान युवा खेळाडूंच्या हातात आहे आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे, असंही तिने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” 

“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…” 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका! 

‘आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?’; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर 

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली…