तंत्रज्ञान

या भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर

मुंबई | यूट्यूब आणि टिकटॉक वाद आणि त्यातच चीनमधून कोरोनाचा प्रभाव सुरु झाल्यानं चीनवर असलेला लोकांचा सगळा राग टिकटॉकवर निघाला आहे. भारतीयांनी तर टिकटॉकची रेटिंग घटवून हे अॅप भारतात बॅन करण्याची मागणी केली आहे.

आता या सर्व गोष्टींच्या आणखी पुढे जात टिकटॉकला आणखी मोठा धक्का बसला आहे. एका भारतीय विद्यार्थ्यानं बनवलेल्या अॅपनं टिकटॉकला मागं टाकत गुगल प्ले स्टोअरवरील टॉप चार्टमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे.

Mitron असं या अॅपचं नाव आहे. हे अॅप टिकटॉकचं क्लोन व्हर्जन असून त्यामध्ये टिकटॉकप्रमाणेच अनेक फिचर्स देण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी आयआयटी रुरकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने हे अॅप प्ले स्टोअरवर टाकलं होतं.

आतापर्यंत या अॅपला ५० लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलं आहे. हे अॅप नवीन असल्याने अर्थातच यामध्ये सध्या काही बग्ज आहेत, ज्यामध्ये लॉगईन करताना अडचण येणे, ऑडिओ अॅड करण्याचे लिमिटेड पर्याय, अशा काही गोष्टींचा समावेश आहे, मात्र असं असलं तरी भारतीय या अॅपला चांगले रेटिंग देत आहेत. येत्या काळात बग्ज हटवण्यात यश आलं तर हे अॅप टिकटॉकची जागा घेऊ शकतं.

महत्वाच्या बातम्या-

-“ठाकरे सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असं म्हणणार्‍यांचं बारावं घालून सरकारने 6 महिने पूर्ण केले”

-बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

-‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

-विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

-“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”