Uncategorized

आमदाराच सांगत आहे, ‘मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका मी तुमच्यासोबत आहे’

मुंबई | कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी बहुतेक लोक आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र लॉकडाऊनमध्ये लाईटबील आले नाहीत मात्र त्यानंतर बिलाची रक्कम पाहून सर्वसामान्य सोडाच सोलिब्रिटी, खेळाडू आणि लोकप्रतिनिधींनाही लाईटबील पाहून शॉक बसला आहे. अशातच एका आमदाराने आपल्या प्रतिनिधींना लाईटबील न भरण्याचं आवाहन केलं आहे.

मी स्वत: वीज बिल भरणार नाही, तुम्ही सुद्धा भरु नका?, मी तुमच्यासोबत उभा आहे, असं आवाहन बहुजन विकास आघाडीचीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलं आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या नव्या आणि जुन्या विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल आकरण्यात आलं आहे. हे बील पाहून त्यांनी असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, विद्युत महावितरण लोकांना फक्त लुटण्याचं काम करत असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली आहे.  एकीकडे कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे पगार कपात झाले आहेत. त्यामुळे घर कसं चालवायचं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यात लाईटबीलाची भर पडल्याने नागरिक त्रस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चांगली बातमी! एसटी कर्मचाऱ्यांनो आपली बँक खाती तपासून पहा, ‘या’ महिन्यापासूनचे पगार झालेत जमा!

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा रोतोरात हटवला; शिवभक्त संतापले

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह