कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!

नवी दिल्ली | देशात कोरोनाने हातपाय पसरले असताना दररोज नवनवे आकडे समोर येत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशातच डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी जे अनबालागन यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर एका खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला आहे.

आजच त्यांनी वयाची 61 वर्ष पूर्ण करत 62 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. आज वाढदिवसादिनी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांवर तर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

आमदार जे अनबालागन हे डीएमके पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केलं होतं. त्यांनी या मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

-“शिवसेना ही बाळासाहेबांचीच… पण भाजप आता वाजपेयी-अडवाणींचा राहिलाय का?”

-राष्ट्रवादीत आता पुष्पगुच्छ, शाल भेटवस्तू बंद… त्याऐवजी ‘या’ गोष्टी द्या- शरद पवार

-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार देखील नाही- शरद पवार

-कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना