भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगेंची वर्णी

पिंपरी | भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगे यांच्या नावावर सहमती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या घडामोडींनंतर त्यांचं नाव निश्चित झालं असून याबाबत लवकरच घोषणा होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता ताकदीचा शहराध्यक्ष हवा, अशी चंद्रकांत पाटील यांची भूमिका होती. आमदार लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे यांच्याकडे ही जबाबदारी असावी यासाठी ते आग्रही होते.

चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर शहरात होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी देखील चर्चा केली.

जगताप शहराध्यक्षपद घेण्यास इच्छुक नसल्याने महेश लांडगे यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी मांडली. यावर एकमत झाल्याने आता पाटील यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-