आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू

मुंबई | शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत.

अशातच आज कणकवली न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता नितेश राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणे यांच्या 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मात्र, न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच आता नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्याने आता त्यांना कारागृहात न ठेवता रूग्णालयात ठेवावं, अशी मागणी राणेंच्या वकिलांनी केली आहे. वकिलांनी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे रितसर अर्ज केलाय.

नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, नितेश राणेंचा अर्ज यावेळी फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणे यांनी शरणागती पत्करली नसल्याने सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. राणेंच्या अर्जावर आता शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता वकिल नितेश राणेंना दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तोंड सांभाळून बोललं पाहिजे”, चंद्रकांत पाटलांचं मलिकांना सणसणीत प्रत्युत्तर

हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!

जेनेलियाने दिली गुड न्यूज! आता रितेश होणार ‘मिस्टर मम्मी’

धक्कादायक! केस वाढवल्यानं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर