वर्धा | आमदार विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलंय.
अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता, या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रहांगडाले यांनी सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघातात निधन झाले होते. यात तिरोडा – गोरेगाव मतदारसंघातील भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचे सुद्धा निधन झालं होतं.
मंगळवारी अविष्कारवर गोंदिया जिल्ह्याच्या खमारी या मुळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिलीय.
विजय रहांगडाले यांनी फेसबुक पोस्टमध्ये अविष्कार याच्याविषयी भावना व्यक्त केल्या. खमारी गावात कोणी डॉक्टर नव्हतं ही हुरहूर असल्यानं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या मुलाला कुणाची तरी नजर लागली, असं त्यांनी म्हटलं.
तुझी आई वाट पाहत असून तू परत येणार नाही हे तिला कसं समजावून सांगू, कुठं हरवलास पाखऱा परत येरे आमच्या लेकरा, अशी भावनिक पोस्ट विजय रहांगडाले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ
सावधान! लस न घेतलेल्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
Bigg Boss 15 Grand Finale: दीपिका आणि सलमानचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! मुंबईत पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती