आमदाराच्या घोरण्यामुळे विधानसभेची शांतता झाली भंग अनं…

१ ते १० मार्च अश्या दहा दिवसाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीला सुरुवात झाली आहे. यातच झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय बजेटची मोठी चर्चा सुरू आहे. या राजकीय चर्चांंमध्ये अनेक गोष्टींविषयी चर्चा करण्यात आली. अशातच काही गमतीशीर गोष्टीही समोर आल्या आहेत.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारनंतर विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रत्येक पक्षाचे आमदार आपलं म्हणणं व्यक्त करत होते. अपक्ष आमदार सरयू राय विधानसभेत आपलं भाषण करत असताना एक मजेशार किस्सा पाहिला मिळाला.

अपक्ष आमदार सरयू राय विधानसभेत बोलत होते, तेव्हा सभेत शांततेची अपेक्षा ठेवू शकतो. विशेष म्हणजे जेव्हा विरोधकांनी सभेवर बहिष्कार केलेला होता. अर्थात तेव्हाही अशीच काहीशी परिस्थिती होती. अशातच सगळीकडे शांतता असताना आणि सरयू राय यांच्या भाषणावेळी घोरण्याच्या आवाज ऐकू येत होता. सगळीकडे शांतता असल्यानं घोरण्याचा आवाज इतका मोठा होता की, सर्वजण त्या दिशेने पाहू लागले. मुख्यमंत्री हेमंत सोरेनदेखील मागे वळून पाहू लागले. आणि त्यानंतर आमदारांना झोपेतून उठवण्यात आलं.

गेल्या काही दिवसांपूर्वी झारखंड अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आणखी एक बातमी आली होती. यावेळी अनेक आमदार देशातून कोरोना गेल्या प्रमाणे मास्क न घालताच विधानसभेत पोहोचले होते. कोरोनाची परिस्थिती पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आमदार मात्र या महासाथीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे.

अधिवेशनादरम्यान अनेक आमदार सहभागी होण्यासाठी मास्क न लावताच पोहोचले असल्यानं यावर त्यांना अनेक प्रश्न करण्यात आले. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही अनेकजणं मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या! शरीराला मजबूत बनवणाऱ्या आवळ्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

    गॅस सिलेंडरच्या दराचा भ.डका! गेल्या 30 दिवसांत चाैथी वाढ, पाहा किती रुपयांनी महागला?

      राठोडांनंतर आता धनंजय मुंडे देखील राजीनामा देणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…

        पुण्यातील ‘या’ ठिकाणी फुकट वडापाव खालल्याने गजा मारणेवर गु.न्हा दाखल

          राठोडांकडून 5 कोटी रुपये घेतल्याच्या त्या आरोपावर पूजाच्या वडिलांनी अखेर माैन सोडलं, म्हणाले…