“प्रत्येक शिवसैनिकांमध्ये माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसतायेत”

मुंबई | मी आज इथे येत असताना मला खूप गर्दी दिसली. त्या सर्व जनतेमध्ये मला पंचमुखी हनुमान दिसले, श्रीराम, जानकी व लक्ष्मण दिसले, गणपती बाप्पा दिसले. ही सर्व लोकंच आमची कवचकुंडल आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या सभेत बोलत होते.

सत्ता स्थापन झाल्यावर मविआने प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवण्याचं काम केलं, माझी आणि मुख्यमंत्र्यांची ही पहिली टर्म, कोरोना काळात जे काम केलं त्याचं कौतुक संपूर्ण जगाने केलं, असं त्यांनी सांगितलं.

सभेला आलेल्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! पोलीस स्टेशनबाहेर केतकी चितळेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक 

मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…