“भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक अवस्थेत गेलीय”

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक अवस्थेत गेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने 4.5 इतकी निचांकी पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

विकासदरासंदर्भात समोर आलेली आकडेवाही ही समर्थनीय नाही. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर अवस्थेत गेली असून लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असं मत मनमोहमसिंग यांनी व्यक्त केलं आहे.

चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीतील विकासदर 5 टक्यांपर्यंत गेला होता. दुसऱ्या तिमाहीत तो अधिक घसरुन 4.5 टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही स्थिती खूप चिंताजनक आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी भारतीय अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर केली आहे. दुसऱ्या तिमाहीतील विकासदर 4.5 टक्क्यांपर्यत गेला असून ही चिंताजनक बाब आहे. हा विकासदर गेल्या सहा वर्षांतील सर्वात निचांकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-