मुंबई | नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चा 14 वर्धापनदिन नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. झेंडा बदलल्यानंतर आज मनसेचा पहिला वर्धापनदिन आहे.
एकीकडे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आपल्या झेंडय़ाचा रंग बदलला असून हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत होऊ घातलेली महापालिका निवडणूकही या वेळी रंगणार असून मनसे या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मनसेचा वर्धापनदिन नवी मुंबईत साजरा करण्यात येत येणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कौतुकास्पद! पेटलेला वणवा विजवण्यासाठी सय्याजी शिंदे सरसावले
-“धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल आहेत; खातेदारांनी घाबरुन जाऊ नये”
-लेकींनी विश्वचषकाच्या फायनलपर्यंत मजल मारली याचा अभिमान पाहिजेच- उदयनराजे भासले
-गेल्या 20 दिवसांत चौथ्यांदा आशिष शेलार राजदरबारी भेटीसाठी पोहोचले!
-ठाकरे-एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणातात…