मुंबई | सुशांतचा बळी जाण्याचं काही कारण नव्हतं, मात्र जर अशाप्रकारे कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत असेल, तर मनसेच्या वतीने त्यांना दणके देण्यात येतील, अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. यासंदर्भात काहींची चौकशी देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेनेदेखील आपली भूमिका व्यक्त केली आहे.
हे असे प्रकार वेळीच न थांबल्यास अशाप्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे प्रेक्षक म्हणून चित्रपट न पाहणे किंवा त्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणे, अशा प्रकारचे दणके देण्यात येतील, अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे.
दरम्यान, सुशांतची आत्महत्या म्हणजे हा सर्व प्रकार क्लेशदायक आहे. खऱ्या कलाकाराचं प्रेम हे पैसे आणि इतर गोष्टींपेक्षा कलेवर जास्त असतं. जर त्याला ते करु दिलं नाही, तर त्याचा स्फोट होतोच. एखाद्याचा बदला म्हणून त्याला इंडस्ट्रीच्या बाहेर काढणे हा गुन्हा आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल- अजित पवार
-सत्ता हाती घेतल्यापासून शिवसेनेनं 100 टक्के समाजकारण केलं- आदित्य ठाकरे
-उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत
-‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार
-चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत