जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!

जळगाव  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जळगावात पोहोचल्यानंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. पण पोलिसांनी त्याआधीच या कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जळगावमधील मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे आणि इतर तीन जणांचा समावेश आहे.

मनसे विरुद्ध सरकार संघर्ष पेटणार

कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतरही राज ठाकरे यांचा आक्रमक अंदाज कायम असल्याचं पाहायला मिळाला.

‘कृष्णकुंज’वर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, अशी कितीही वेळा चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावर मनसैनिक सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सर्वात कमी सरासरी असणाऱ्या ‘या’ खेळाडूंनी सावरला भारताचा डाव!

-काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; नरेंद्र मोदींचा पराभव करणं अशक्यच

-उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा; रणजित निंबाळकर म्हणतात…

-पी. चिदंबरम हे ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक; शिवसेनेची ‘सामना’तून टीका

-‘त्या’ ट्वीटवरुन सयाजी शिंदेनी केली दिलगिरी व्यक्त