आता मंत्रिमंडळावर असणार मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ ची करडी नजर

मुंबई | शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेने पहिल्या अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनात मनसे मंत्रिमंडळावर शॅडो कॅबिनेट स्थापन करणार असल्याचं कळतंय.

शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून मनसेचा प्रत्येक नेता राज्य सरकारच्या कारभावारावर करडी नजर ठेवणार आहे. आज दुपारी 3 वाजता मनसेचे नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत.

मनसेच्या अधिवेशनात शॅडो कॅबिनेटची नेमणूक करणार असून राज्य सरकारच्या कारभारावर, मंत्रिमंडळातील प्रत्येक खात्यावर मनसेचं लक्ष राहणार आहे.

दरम्यान, मनसेच्या प्रत्येक नेत्यावर जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती आहे. मनसेचं आज पहिलं अधिवेशन होत आहे. यामध्ये मनसेकडून पक्षाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-