राज ठाकरेंच्या लतादीदींना ‘मन’से शुभेच्छा

मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या लतादीदी यांचा आज स्वतंत्र असा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अगदी कलाविश्वापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींसोबतचे जुने फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली 77 वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा’, असं कॅप्शन देत राज ठाकरे यांनी लतादीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांच्याप्रमाणेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील लता मंगेशकर यांना ट्विटरवर टॅग करत शुभेच्छा दिल्या.

‘एक विलक्षण आवाज. एक दिव्य स्वर, ज्याचं संगीत रसिकांच्या मनात एक खास स्थान आहे. एक गोड नाव, जे जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं, अशा लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ , असं शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केलं. 

 

महत्वाच्या बातम्या-