मोदी सरकारने केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत , आज बाळासाहेब ठाकरे हवे होते- राज ठाकरे

मुंबई | राम मंदिराच्या भमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उद्या पार पडणार आहे.  उद्या देशभरात कानाकोपऱ्यात राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याचा आनंद साजरा होणार आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन जुन्या आठवणींना उजाळा देत उद्याचा दिवस पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हवे होते, असं ट्विट करत एका पत्रामध्ये म्हटलं आहे.

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नसून शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे. कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

नेटाने लढलेली न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! कैदी मुलाला सोडवण्यासाठी आईने खोदलं भलं मोठं सुरंग पण…

…म्हणून कोणत्याही चित्रात रामाच्या मुर्तीला मिशी नाही, संभाजी भिडे अज्ञानी; राम मंदिराचे पुजारी भडकले

सुशांत सिंह प्रकरणवरून आरोप होत असलेल्या आरोपांवर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत