औरंगाबाद महाराष्ट्र

“मागणी तुम्ही केली तर चालते मग अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?”

औरंगाबाद | शिवसेनेनं औरंबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेनं केली आहे. सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर होतं असेल तर यात वावगं काय?, चांगल्या गोष्टींसाठी बदल हे अनेकवेळा आवश्यक असतात. मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांना जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

दरम्यान, मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर येईन, धर्माकडं वाकडं बघाल तर हिंदू म्हणून समोर येईन, असं पुन्हा एकदा ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

-शिवरायांवरच्या टिकटाॅक वरील या व्हीडिओने सोशल मीडियावर घातला चांगलाच धुमाकूळ!

-अजित पवारांनी दिला मुंबईच्या डबेवाल्यांना सुखद धक्का; देणार…

-मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय चुकीचा; आघाडीत वादाच्या ठिणग्या

-कोल्हेंना चिमूरडीची भावनिक साद; आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला… ते तुम्हाला पकडतील…