मनसेची शिवसेनेवर मोठी टीका; “शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर जनता…”

मुंबई | शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन गट तयार झाले. एक बंडोबांचा गट म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उर्वरीत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात कार्यरत असलेला गट आहे.

या बंडखोरीमुळे महविकास आघाडी सरकार (MVA) पडले आणि एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. आता त्यांच्यात खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे कार्यक्रम कोणी घ्यावे, यावर दोघांमध्ये चुरस लागली आहे.

शिवसेनेच्या या अंतर्गत भांडणात काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसेच्या (MNS) नेत्यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांनी आणि काँग्रेसने शिवसेनेची पाठराखण केली आहे.

आता मनसे पक्षाने उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका देखील केली आहे.

शिवसेनेचा उल्लेख त्यांनी ‘शिल्लक सेना’ असा केला आहे, तर दसरा मेळाव्याला त्यांनी ‘टोमणे मेळावा’ म्हंटले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील मध्ये ओढले आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी दसरा मेळावा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना ‘टोमणे प्रमुख’ असा तर शिवसेनेचा शिल्लक सेना, असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेने शिवसेनेला परवानगी नाकारल्यास भाषणातून होणाऱ्या मनोरंजनापासून जनता वंचित राहील, असे गजानन काळे म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने शिवसेनेला एकदाच काय ती परवानगी देऊन टाकावी, असे देखील ते म्हणाले.

खंजीर, मर्द, मावळा, निष्ठा, गद्दार यापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या होणाऱ्या मनोरंजनाला जनता मुकू नये, अशी आग्रहाची विनंती करत त्यांनी शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी देण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस…

“लग्न केवळ शारीरिक सुखासाठी नसते, तर…”; उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

दसरा मेळाव्याबाबत संजय राऊतांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले, ”शिवसैनिकांनी शिवाजी पार्क…”

वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ममता बॅनर्जींची मोठे वक्तव्य; केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत, तर भाजप…