मुंबई | मागील महिन्यात शिवसेना (Shivsena) पक्षात बंड केल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेचे आपले हक्काचे म्हणता येण्यासारखे लोक देखील जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणारे लोक गुपचूप जात नाहीत तर गाजावाजा करत, पत्रकारांना सांगून जात आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांचे फोटो समाज आणि प्रसार माध्यमांवर झळकत होते.
मंगळवारी मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले (Yogesh Chille) हे 100 कार्यकर्त्यांसह शिंदे गटात गेल्याचे वृत्त आले होते. मनसेकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून फसवणूक झाल्याचे मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी सांगितले. पक्षाच्या 30 – 40 कार्यकर्त्यांना फसवून नंदनवन या शिंदे यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर त्यांचे शिंदेंसोबत फोटो काढण्यात आले, असे चिले यांनी म्हटले आहे.
पनवेल आणि उरण या भागांतून मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त आणि फोटो व्हायरल झाले होते. त्याच्यावर मनसेकडून आता खुलासा केला गेला आहे.
रात्री उशिरा मलबार हिलवरील नंदनवन बंगल्यात मनसे कार्यकर्त्यांचे फोटोसेशन झाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केल्याचे बोलले जात होते. परंतु आता खुद्द मनसेनेच हा दावा फेटाळल्यामुळे या प्रकरणावरचा पडदा वर झाला आहे.
मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, उरण आणि पनवेल येखील मनसे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले होते, अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मनसेेचे पनवेल शहाराध्यक्ष यांनी हे वृत्त फेटाळले.
महत्वाच्या बातम्या –
‘भाऊ पंतप्रधान तर मी उपाशी मरायचं का?’, पंतप्रधान मोदींच्या भावाचेच मोदी सरकारविरोधात आंदोलन
हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….
उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?
“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”
अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…