‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

मुंबई | मनसेने आंदोलनादरम्यान राजमुद्रा असलेल्या आपल्या पक्षाचा झेंडा वापरून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रेचा अपमान केला आहे, असा आरोप शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान आणि भारतीय मराठा महासंघाने केला आहे.

ठाण्यातील गोकुळनगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचं सांगत शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी त्या नाल्यात उतरून आंदोलन केलं. यावेळी एक कार्यकर्ता तो झेंडा हातात घेऊन नाल्यात थांबलेला फोटोत दिसतोय. यावर शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान तसेच भारतीय मराठा महासंघाने आक्षेप घेतला आहे.

शहरअध्यक्ष रविंद्र मोरे यांनी हे आंदोलन केल्याने त्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान आणि भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

दरम्यान, मी स्वात: झेंडा हातात घेतला नव्हता. ते कार्यकर्तांनी आणला होता. तसेच तो नाल्यात नाही हातात धरला होता. त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही, असं रविंद्र मोरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

-गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

-‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

-कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

-लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव