पुणे : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला डीजे आणि डॉल्बी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण डीजे आणि डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील यांना कलम 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावरुन त्यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांना भाऊ म्हणून दादा म्हणावं की गुंड म्हणून दादा म्हणावं, असंही मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
डीजे डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केलं तर कारवाई केली जाईल या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याबाबत रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली आहे.
नोटीस पाठवल्यामुळे रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे सूडबुद्धीने वागत आहेत असा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचं वार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्यात भाजप आणि शिवसेनेमधली जोरदार मेघाभरती अशी लगबग सध्या विधानसभेची आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तरी याच फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू- प्रकाश आंबेडकर- https://t.co/n76oZCHnTF #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
मनसेच्या रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश- https://t.co/Hr6VYjip7C @Rupalipatiltho1 @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
आऊटगोईंगवरुन अण्णांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी! – https://t.co/O679lJXGzZ @Anna_Hazare @PawarSpeaks @Harshvardhanji
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019