महाराष्ट्र मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?; मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा

BATHROOM AT MUMBAI

मुंबई| छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात सर्वसामान्य जनतेसाठी अद्ययावत शौचालयही खुले करण्यात आले आहे. मात्र, या शौचालयास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याचा आरोप करत मनसेनं भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मनसेच्या टीकेनंतर आमदार प्रसाद लाड यांनी आपलं ट्विट डिलीट केलंय. पण, बहुउद्देशीय केंद्राला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून शौचालयास दिले नसल्याचे भाजप समर्थकांनी स्पष्ट केलंय. विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेल्या शौचालयाचं उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते केलं. या सोहळ्याला आमदार आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, कॅप्टन तमिल सेलवन, आमदार कालिदास कोळमकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

4 मार्च रोजी रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये एका उद्घाटन सोहळ्याची माहिती त्यांनी दिली होती. आपल्या मतदारसंघात एक बहुउद्देशीय केंद्र आणि अद्ययावत शौचालयाचे उद्घाटन केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याचा आरोप करत मनसेने भाजपावर टीका केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांच्या ट्विटला आक्षेप घेत ”ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला???” असे म्हटले आहे. देशपांडे यांच्या ट्विटनंतर प्रसाद लाड यांनी आपलं ट्विट डिलिट केलं आहे. मात्र, जर, शौचालयास छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच दिलं नाही, तर लाड यांनी ट्विट डिलिट का केलं, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, देशपांडे यांच्या ट्विटचा अनेक भाजपा समर्थकांनी समाचार घेत, राजकारण करा पण डोळस करा, असा सल्लाही त्यांना दिलाय.

 

PRASAD LAD

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याच्या महापौरांनी घेतला “कष्टाच्या भाकरी’चा आस्वाद

-अयोध्येत शरयु आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत!

-“अहो, काळजी नको हे सरकार आपसातील अंतर्विरोध अन् विसंवादातूनच पडेल”

-ठाकरे सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातील 20 महत्वपूर्ण निर्णय; वाचा यादी

-कोरेनाचे थैमान! भारतातील करोनाबाधितांची संख्या पोहचली 30 वर