‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरुन शिवसेनेवर निशाणा साधत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. देशपांडे यांनी ‘शेम ऑन शिवसेना’ असा हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत.

शिवसेनेची हीच ती वेळ अशी टॅग लाईन वापरत देशपांडेनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ, अशी पोस्ट करत संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मृतांचा आकड़ा लपवून जनतेची फसवणूक करण्याची हीच ती वेळ, असंही एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

संदीप देशपांडे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी  केला होता.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-‘काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावं’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

-भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

-जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना