“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय”

मुंबई | राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेली बहुचर्चित पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे पार पडली. त्यानंतर राज्यात राजकीय वादाला सुरूवात झाली आहे. परिणामी आता पत्रकार परिषदेवर टीका टीपण्णी चालू आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदेबद्दल सर्वांना सांगितलं होतं. आपण पत्रकार परिषदेत साडेतीन नेत्यांबद्दल बोलणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं होतं.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करण्याचं सांगितलं होत पण प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही, अशी टीका आता विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी आम्हाला फसवल्याचं देशपांडे म्हणाले आहेत.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे, म्हणून राऊत यांच्यावर फसवणुकीचा 420 गुन्हा दाखल करावा, असं देशपांडे म्हणाले आहेत.

शिवसेनेनं ज्याप्रकारे गर्दी जमवली त्याबद्दल देखील देशपांडे यांनी आक्षेप घेतला आहे. आज ज्या पद्धतीनं गर्दी जमवली त्यामुळं कोरोना पसरणार नाही का?, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात नवा वाद सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ