जनाची नाही किमान मनाची तरी…; मनसेची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांच्या अयोध्यावारी आधीच राजकारण तापत असल्याचं दिसत आहे. कारण महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा, अशी कडवड टीका देशपांडे यांनी केली आहे.

शिवसेनेनं भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत मिळून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा गाजण्याची शक्यता आहे. कारण अयोध्येत येणाऱ्या उद्धव ठाकरेंना विरोध करणार असल्याची भूमिका काही साधूंनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकार सकारात्मक”

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही- अण्णा हजारे

-कोकणचं नैसर्गिक वैभव जगासमोर आणणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

-कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रम्प यांनी दिली तब्बल ‘इतक्या’ निधीला मंजुरी

-अखेर निर्भयाला न्याय मिळणार!; 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता नराधमांना दिली जाणार फाशी