पुणे | मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती.
रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रारीची नोंद केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे.
आपल्या मुलाला आलेल्या धमकीच्या पत्राबाबतची एक पोस्ट वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे.
राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हतं, पण आज ठरवलं तुमच्या सोबत बोललच पाहिजे, असं वसंत मोरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफरमध्ये सावध रहा रुपेश, अशी चिठ्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली, असं वसंत मोरेंनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”
देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…
राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी
सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी