मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे मनसेने आंदोलनाचे हत्यार उचलत सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय विभागाने नोटीस बजावली आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात आज मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि विभाग प्रमुख उपस्थित राहणार असून मनसेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. परंतु आता मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत असं जाधव यांनी सांगितले.

तसेच या सर्व प्रकरणावरून मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीन संदर्भात जी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे मोदी सरकारची गोची झाली.

दरम्यान, राज ठाकरेंना इडीच्या प्रकरणात गुंतवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा इव्हीएममध्ये फेरफार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-“…त्यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा”

-मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा फडणवीसांवर आरोप; कठोर कारवाईची मागणी

-पूरग्रस्तांना दिलासा; सरकारकडून ‘या’ महत्वाच्या घोषणा

-पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका

-गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका