मुंबई | राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आल्यामुळे मुंबईत बेस्ट बस सुरु झाल्या आहेत. मरिन ड्राईव्ह आणि चौपट्यांवर गर्दी होतानाचं चित्र आज ठिकठिकाणी पाहायला मिळालं. यावरुन राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनवर मनसे आमदार राजू पाटील टीका केली आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. तसेच राजू पाटील यांनी मरिन ड्राईव्ह, रस्त्यावरील ट्राफिक आणि अनेक लोकांच्या रांगा लागलेले फोटो ट्विट केले आहेत.
तुमचा #lockdown_exit_plan काय ?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलंच नियोजन आणि धोरण दिसत नाही, असं ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारला होता.
“तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मा.राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही.@CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/vzBbYrDJFU
— Raju Patil (@rajupatilmanase) June 8, 2020
महत्वाच्या बातम्या-
-…त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना पैसा द्यावाच लागणार; चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा
-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर
-शेतकऱ्यांसाठी कृषितज्ज्ञांनी दिला ‘हा’ अत्यंत महत्त्वाचा सल्ला
-“… तर मी स्वत: सामनाच्या कार्यालयात येऊन पाया पडायला तयार आहे”
-“सोनू आम्हाला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरलेली नाही”